बराच वेळ विचार केला की मराठीत लिहावं की हिंदीत की इंग्रजीत पण शेवटी मराठी अस्मिता जागी झाली….. असं काही नाहीए.. हा सिनेमा पाहणारे आणि इच्छुक असणारे ९०% मराठीच/ मराठी कळणारे अर्थात अनेक वर्षे महाराष्ट्रात राहणारे असणार त्यामुळे मराठीत लिहितोय!!
एका हाकेवर मुंबई बंद करणारी पहिली व्यक्ती म्हणजे समाजवादी / राजकारणी जॉर्ज फर्नांडिस, ज्याचं काल निधन झालं. दुसरी व्यक्ती म्हणजे अर्थात बाळ केशव ठाकरे!!
जितकं ट्रेलर धडाकेबाज तितकाच सिनेमाही! बऱ्याच उलट सुलट चर्चां नंतर शेवटी dubbing artist कडून हुबेहूब ठाकरेंचा आवाज देण्यात आलाय. सिद्दीकी चा गेटअप, मेकअप एकदम जमलाय.… prosthetic मोठं नाक, भांग पाडण्याची तऱ्हा, चष्म्याची फ्रेम, रुद्राक्ष, भगवे वस्त्र, टिपिकल चपला! अभिनयात बाप असलेला सिद्दीकी इथे वेगळ्याच \”बापाची\” भूमिका करतोय. हातवारे, बोलण्यातला कणखरपणा आणि आत्मविश्वास एकदम जमलाय! फक्त सगळ्या घटना आणि व्यक्ती कळायला थोडा इतिहास माहिती असलेला चांगला! मला बऱ्याचशा गोष्टी माहीत असताना सुद्धा जरा काही ठिकाणी गडबडायला झालं. संवादलेखन किती उत्तम आणि प्रत्यक्ष ठाकरेंच्या भाषेच्या जवळ जाणारं आहे ह्याचा अंदाज आपल्याला ट्रेलर मधेच येतो! छायाचित्रण अर्थात cinematography ला दाद द्यावी तेवढी थोडी आहे! मग ती एयर इंडिया च्या महाराजाला मारलेली प्रतिकात्मक चपराक असो की बाबरी मशीद प्रकरणातील सुनावणी असो की मनोहर जोशी मुख्यमंत्री होतानाचा रिमोट कंट्रोलचा close up असो!इतकंच काय चकोर लिहिलेला माईक सुद्धा! ठाकरेंना कुठेही दैवत करण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटत नाही! शाब्दिक आणि प्रत्यक्ष हिंसा ह्याचा त्यांनी केलेला वापर सिनेमात बेधडक दाखवला आहे! आता ते बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा आहे. मी लहान होतो तेव्हा क्रिकेटवेड्या मला वानखेडे शिवसैनिकांनी उकरून काढलं ह्याचं दुःख आणि राग होता. पण हळूहळू पाकिस्तान ही काय चीज आहे हे कळल्यावर देशापेक्षा जास्त खेळाला महत्व नाही देऊ शकत हेही कळलं. उद्धव आणि राज ठाकरे सोडले तर casting ही चांगलं आहे. राजेश खेरा मोरारजींच्या भूमिकेत उठून दिसतात! सिद्दीकी सोडून एकमेव बऱ्यापैकी स्क्रीन time असलेली मीनाताई ठाकरेंची भूमिका करणाऱ्या अमृता राव चा अभिनय पण जमलाय.. मराठीतलं lip sync पण! अभिजित पानसे ह्या नवख्या दिगदर्शकाने \”शिवधनुष्य\” चांगलाच पेललाय!! बाकी निर्मिती तर काय स्वतः संजय राऊत ह्यांचीच आहे.
दोन विरोधाभास :
१. नवाजुद्दीन सिद्दीकी हा उत्तरप्रदेशी मुसलमान आहे!
२.आणि मी हा सिनेमा एका तेलगू मित्राबरोबर मराठीत पहिला!
ज्या गोष्टींचा विरोध म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांना डोक्यावर घेतले! सांगण्याचा हेतू हा की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात आणि काही ठिकाणी \”राज\”कारण सुद्धा असतं!
ठाकरेंना विरोध करणारे अनेक म्हणतात त्यांनी धार्मिक आणि प्रादेशिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडे दक्षिणेतला टोकाचा हिंदी विरोध, आताचा समाजवादी पक्ष, बसप, ओवैसी, TRS इतकंच काय साक्षात मनमोहन सिंग ह्यांच्या धार्मिक, प्रादेशिक आणि जातीयवादी वक्तव्यांचे आणि कृतींचे काही कमी दाखले नाहीयेत!
जो कायापालट ह्या माणसाने घडवला त्यापैकी किती बरोबर किती वाईट आणि सिनेमातील घटनांचं सत्यशोधन हा उहापोह करण्याचा विषय आहे.. पण कधीतरी नंतर. एक मात्र खरं, ह्या माणसाने मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, स्वतः च्या नजरेत सुद्धा!
it seems that every Maharashtrian should see the movie
superb
a bright, well-written review that holds the reader till the end
keep it up