Don\’t Worry Be Happy (नाटक) : एक अनुभव!

घासून घासून गुळगुळीत झालेलं असं वाक्य शीर्षक म्हणून ! ह्या संकल्पनेवर आधारित अनेक नाटकं आणि चित्रपट अलीकडे येऊन गेले. अतिशय नाजूक असा विषय विनोदी ( कुठेही असंवेदनशील किंवा हलक्या दर्जाचा न होता) पण तितक्याच हळुवारपणे भावनांना हात घालत हे नाटक हाताळतं.

प्रेम विवाहानंतर बदलणारे नवरा बायकोचे स्वभाव आणि विविध अडचणींना खाजगी आणि व्यवसायिक जीवनात सामोरे जाताना उडणारे खटके, आणि त्यातून ते बाहेर कसे येण्याचे ठरवतात असे साधरण कथानक आहे. विनोदी संवाद हे अतिशय दर्जेदार आणि पूर्णतः अनपेक्षित असल्याने अधिक परिणामकारक आहेत. \’ मी तुला आतापर्यंत इतके वेळा I am sorry म्हणालो आहे की अनेकदा I love you च्या ऐवजी I am sorry च तोंडात येतं\’ हा उमेश कामत च्या तोंडचा डायलॉग समस्त पुरुष जातीच्या हृदयाला भिडणारा आहे!! 😂😂😂 चिंतन ( आशुतोष गोखले ) सारखा family friend ज्यांना लाभतो ते खरंच नशीबवान म्हणावे लागतील. बाकी उमेश कामत आणि स्पृहा जोशी बद्दल काय बोलायचं?? एकदम नैसर्गिक असा अभिनय करणारे असे दोन कलाकार आहेत हे!

१५ एक मिनिटं सोडली तर जवळपास पूर्ण वेळ नाटक एका नोकरी करणाऱ्या बायकोचीच कशी त्रेधातिरपीट होते ह्या भोवतीच फिरतं. अलीकडे आपल्याकडे स्त्रीवादी म्हणजे समानता अशी काहीशी विचारसरणी होत चालली आहे की काय असा मला प्रश्न पडतो. असो! कदाचीत माझा दृष्टिकोन biased असू शकेल.
So, just don\’t worry and be happy!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *