ज्या माणसाच्या लेखनावर माझी आणि आधीच्या बहुतेक २ पिढ्या मोठया झाल्या त्याच्यावरील जीवनपट ही पर्वणीच होती! फक्त थोडीशी धाकधूक पण होती की काही अंशी तरी त्या ताकदीचे सादरीकरण होते का??
तर सुरुवात होते ती पुलं प्रयाग नावाच्या डेक्कन जिमखाना, पुणे येथील इस्पितळात भरती असताना त्यांना भेटायला येणाऱ्या निकटवर्तीयांपासून आणि त्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या आठवणीं पासून.. आणि सिनेमा फुलत जातो. पुलंचे सुनीताबाईंबरोबर होणारे मतभेद, गैरसमज आणि अति महत्वाच्या प्रसंगी त्यांच्याकडे ( बाईंकडे) होणारे दुर्लक्ष हे \”आहे मनोहर तरी\” ह्या सुनीताबाईंच्या पुस्तकांतून आले असावेत. तर विविध प्रसंगी रावसाहेब, अंतू बरवा हे पण झळकून जातात. हल्ली कोणाच्याच भावना दुखावल्या जाऊ नयेत अथवा सत्य फिरवलं असं होऊ नये म्हणून सुरुवातीलाच disclaimer देण्याची पद्धत सुरू झालीये. पण त्यामुळे आमच्यासारख्या चोखंदळ, चिकित्सक आणि सत्यशोधक (😁😁) लोकांचं काम वाढून जातं. तर सांगायचा मुद्दा असा की महेश मांजरेकरने एका मुलाखतीत म्हटलंय की बाळ ठाकरे हे खरोखर पुलं आणि सुनीताबाईंचे शाळेत असताना विद्यार्थी होते. फिल्मी वाक्य म्हणून नाही पण खरंच सांगतो, गदिमा आणि पुलंचे \”नाच रे मोरा\” ऐकून आम्हा भावंडांना आमचे आजोबा पेटीवर \”नाच रे मोरा\” वाजवून दाखवायचे त्याची खूप आठवण झाली! शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो न कळणाऱ्या माझ्या सारख्या अडाण्यालासुद्धा शेवटची कुमार गन्धर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे (सिनेमात जयतीर्थ मेवूनडी, राहुल देशपांडे आणि भूवनेश कोमकली ह्यांचा playback) आणि पुलं देशपांडे ही गाण्याची मैफिल सुखावह वाटली. तसा पुलंना कुठेही \”पुरुषोत्तम\” न बनवता त्यांच्यातील दोषही पुढे आणण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल!
सर्वप्रथम, महेश मांजरेकरांचे अभिनंदन की त्यांना ह्या व्यक्तीवर जीवनपट करायची इच्छा झाली. माझ्याच पिढीतील किती लोकांना पुलं आणि त्यांचे साहित्य ठाऊक आहे ह्याबद्दल मला दाट शंका आहे.. पुढच्या पिढीबद्दल न बोललेलेच बरं! त्यामुळे त्यांनी पुलंना पुन्हा एकदा लोकांसमोर आणलं ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. सागर देशमुख प्रमुख भूमिकेत शोभून दिसतो. स्वतःच्या नाटक आणि लेखन वेडात हरवलेला, मोठा होऊनही लहान मुलासारखा वागणारा, एक संसारी पुरुष म्हणून असलेल्या आपल्या जवाबदाऱ्या टाळणारा आणि सिगरेटीच्या काही अंशीतरी अधीन गेलेला ( ह्याचा सत्यशोध घ्यायला हवा) ! त्याचा मेकअप हा पुलंच्या जुन्या कृष्णधवल चित्रफितीतील प्रयोगांशी जुळून येतो! इरावती हर्षे काशीनाथ घाणेकर आणि ह्या सिनेमा नंतर फक्त एका त्रस्त चिडचिड्या बाईचा रोलच चांगला करू शकते असं वाटतं. अनेक प्रसंगात ती आनंदी आहे की त्रस्त की दुःखी हेच कळत नाही. अंतू बरवा ह्या पात्राला अनुनासिक ( स्पष्ट सांगायचं तर कोकणस्थ ब्राह्मणी ) आवाज असल्या शिवाय मजा नाही, ज्याची इथे प्रकर्षाने उणीव भासते. संवादांना खास नमन!
पुलं गेले तेव्हा मी त्यांचे लेखन कळण्यासाठी जेमतेम कळत्या वयाचा होतो. त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा/ ऐकण्याचा योग तर कधी येऊ शकला नाही! पण त्यांचं लेखन तर कायम समरणात राहील! पुलंनी \”असा मी असा मी\” मधे म्हटल्याप्रमाणे he is the most reverend gurudeva for me! प्रणाम!! 🙏🙏
Parikshan changle lihiles 😊 Bahutek cinemacha uttarardha yenar ahe. Swatah Mahesh Manjrekar BABDU cha character mast karayche tyanni kele ahe ka ? Parikshan vaachun cinema pahaychi itchha hotiye.
धन्यवाद 🙏🙏 जरूर पहा सिनेमा. महेश मांजरेकर पूर्वार्धात वेगळ्याच भूमिकेत आहे आता उत्तरार्धात बघू काय होतंय…
Kya baat Mitra mastach ekdam
Dhanyawad mitra!!
तू लिहिले आहेस त्याप्रमाणे पुढच्या पिढीला पुलं बद्दल माहिती होण्यासाठी अशा प्रयत्नाची गरज होती. वेगवेगळ्या थरातून टोकाच्या प्रतिक्रिया येणं पण स्वाभाविक होतं
पण त्यानिमित्ताने पुलं बद्दल तरूण पिढी काही वाचेल, ऐकेल आणि पाहिल (पुस्तकं, सीडी आणि डीव्हीडीतून) तर त्यातून एका पुलाच काम भाई चित्रपट करेल हे नक्की
आपण पूर्वार्धात पुलं चार व्यक्तिपण पाहिलं
बहुतेक वल्लीपण उत्तरार्धात पहायला मिळेल. त्यामुळे त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे च