सध्या आपण सगळेच स्थानबद्ध (house arrest) आहोत आणि वर्क फ्रॉम होम चा वेळ सोडला तर विविध प्रकारचा घरी बसून विरंगुळा शोधत आहोत. अशा वेळी \’आणि काय हवं\’ ही मराठी वेबसिरीज MX प्लेअर ह्या app वर उपलब्ध आहे. धडाकेबाज पहिल्या सिझन नंतर पाच दिवसांपूर्वीच दुसरा सिझन आपल्यासमोर आला आहे. ही कहाणी आहे एका नवविवाहित जोडप्याची, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यांची, आणि त्यातून मार्ग आणि आनंद शोधणाऱ्या जीवन साथीदारांची!! पहिल्या सिझन मध्ये नवीन घर आणि कार आहे, आईच्या हातच्या स्वयंपाकाचं कौतुक आहे, रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात लागणारा ब्रेक आहे, वाढत्या वजनाच्या चर्चा आहेत आणि आपल्या लग्नापूर्वीच्या आयुष्यातील मित्र मैत्रिणी पण आहेत. ज्यांनी अजूनही पहिला सिझन पहिला नाहीये, त्यांनी जरूर तो लवकरात लवकर पहावा.पु ल देशपांडेंनी पाळीव प्राणी आणि पक्षी आणि त्यांचे पालक यांचे टोकाचे पाल्यप्रेम ह्याचे अगदी अचूक वर्णन ४० वर्षांपूर्वीच केले आहे. त्याची काहीशी झलक पहिल्या भागात मिळते. हो नाही करता करता दोघांना आवडणारे कुत्रा आणि मांजर, सॉरी, डॉलर आणि नोट (हो ही नावं आहेत, आणि त्यांना नावानेच हाक मारायला लागते 😅😅) काही दिवसांसाठी का होईना पण त्यांच्या घरी येतात. शेवट काहीसा तुटक, अनपेक्षित आणि अचानक वाटला!दुसऱ्या भागात \’ अशी ही बनवाबनवी\’ ह्या अति डोक्यावर घेतलेल्या सिनेमातील पात्राचं नाव लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरलं आहे. इथे संगीतातील टोकाची दैवत पूजा दाखवली आहे.तिसऱ्या भागात छोट्या आजारपणाचा मोठा केलेला बाऊ आहे. एकमेकांना मजेत मारलेले टोमणे आणि घेतलेली काळजी आहे.चौथ्या मध्ये भुताची भीती आणि कथा आहे. जितकी कथा अपरिणामकारक आहे तितकेच संवाद साधे आहेत.पाचव्यात एकमेकांपासून कामानिमित्त असलेला दुरावा आहे. एकमेकांबद्दलची काळजी, प्रेम आणि जवळीक आहे.सहाव्या आणि अखेरच्या भागात मूल होऊ देण्याबद्दलची चर्चा आहे. त्याकडे बघण्याचे नवरा आणि बायको ह्यांचे दोन पूर्णतः वेगळे दृष्टीकोन आहेत!भाग, अर्थात एपिसोड हे काही रटाळवाण्या मालिकांप्रमाणे तासभर नसून ३० मिनिटाच्या आत संपतात. उमेश कामत आणि प्रिया बापट च्या अभिनयाला दाद द्यावी तेवढी कमी आहे. खऱ्या आयुष्यातील नवरा बायको आणि उत्तम अभिनेते ह्यामुळे जी केमिस्ट्री जमते ती खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते. पण पहिल्या सिझन मधील कथा, प्रसंग, संवाद हे नक्कीच उजवे ठरतात. बहुतांशी शूटिंग हे पुण्यात झालेले दिसतंय. वरुण नार्वेकरचं दिग्दर्शन रंगत वाढवते! एकूण, उन्हाळा आणि house arrest असताना मस्त आईस्क्रीम खात मनोरंजन होईल, आणि काय हवं??
लगेच पाहून घेतो. कारण एकदम भूतकाळात जाऊन काही छोटे छोटे आनंद, भांडणं आठवून मज्जा येईल. चांगला change होईल..,
मस्त वाटतं वाचायला तुझा ब्लॉग… वाट पाहत असतो तुझ्या ब्लॉग वरील नव्या रिव्ह्यू ची
review wachnyapurwi mi web series paahili hoti… tuza riview wachun purn web series dolya samor aali😍… khup chan👍
Surekh as usual. Feel like you are getting more professional…ripening with time n experience.
Interesting, 1st season baghawa lagel. Thanks for the review.
Sure. Check it out! 😊