ज्याप्रमाणे चित्रपटातलं एक पात्र देवाला चातकासारख शोधत असतं त्याप्रमाणेच मी हा सिनेमा पाहायला संधी शोधत होतो आणि शेवटी सगळं जुळून आलं!
DCH, ZNMD, YJHD ह्या हिंदी सिनेमानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीला ह्या पद्धतीच्या कथानकांनी ग्रासलेले दिसतंय. मायाला पहिल्या गाजलेल्या पुस्तकानंतर नवीन पुस्तकासाठी काही \’क्लिक\’ होत नसतं म्हणून ती अचानक उठून कोणाला काहीही न सांगता एक दिवस मैत्रिणीबरोबर कोकणात निघून जाते! बाकी सिनेमा मराठी असो की हिंदी की इंग्रजी की तमिळ, ह्या पात्रांना पोटापाण्याची सोय करायची गरज पडतांना कधी दिसत नाही!! नाहींतर आम्ही,आम्हाला हे ह्याच्यासारखे महिनोंमहिने फिरायला सुट्टी आणि पैसे दोन्ही नाही!! 😂😂 असो!
कथेच्या सुरुवातीलाच घडणारी एक घटना शेवट पर्यंत विविध पात्रांना बरोबर घेत वेगवेगळे पैलू उलगडत जाते. नंतरही असे अनेक प्रसंग घडत जातात. आधी दुःख देणारी आणि नंतर अतिशय राग आणणारी अशी स्वतःच्याच मृत्यूचं नाटक रचायची कल्पना विचार पाडायला भाग पाडते, \’Who will cry when you die?!\’ ( रॉबिन शर्माचं अतिशय गाजलेलं हे पुस्तक लगेच वाचायला घेतलं मी!)
सम्पूर्ण सिनेमाभर चातकासारखी \’देवाला\’ शोधणारी \’माया\’ आणि माया सरतेशेवटी and they lived happily ever after असे राहतील असं वाटतं पण तसं होत नाही…
अंकुश चौधरी च्या प्रेमात मी आधीपासून होतोच ते अजून गाढ झालं! फक्त ते त्याचं टीव्हीवरच्या सीरिअलमधल्या राक्षसासारखं नाटकी हास्य सोडलं तर! बाकीचे कलाकारही उत्तम आहेतच. ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू ह्यांचा हा अखेरचा चित्रपट असावा! गाणी अगदी मोजकी असल्याने आणि कथानकाला बर्यापैकी वेग आणि वळणं असल्याने सिनेमा खिळवून ठेवतो! पैश्यामागे आणि भौतिक सुखामागे धावता धावता आपण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद च विसरलो आहोत का हा विचार करायला आपण प्रवृत्त होतो…
आणि काही संवाद म्हणजे तर सोने पे सुहागा….
\”आपण जेव्हा एखाद्याला surprise करतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक येते आनंदाची, ती चमक मला अनुभवायला आवडते!\”
\”माझं माझं आपण म्हणत असतो, पण आपलं असं काहीच नसतं. आत घेणारा श्वास आणि बाहेर जाणारा प्राण आपले नसतील तर जगात कुठलीच गोष्ट आपली नाही!\”
एका अतरंगी मित्राने सुचवलेल्या चित्रपटाचा अगदी अंतापर्यंत आनंद घ्यायला मिळला!