सिद्धार्थ (विशेषण म्हणून) सोनालीचा सचिन (अर्थ — अत्तर/ शुद्ध) \’गुलाबजाम\’!!
अनेक लोकांकडून कौतुक होऊनही, गेले काही सिनेमे पाहिल्यानंतर आळसापायी परीक्षण लिहिले नव्हते!! पण हा विषय इतका माझ्या हृदयाजवळचा होता की मग बाकी अनेक चांगल्या सिनेमाचे पर्याय मागे पडले आणि आपोआप लिहायला घेतलं…
आपल्यातल्या बहुतेक लोकांप्रमाणे स्वतःच्या नोकरीला कंटाळलेला आदित्य लहानपणीच्या आठवणी आणि आवडीतून निर्माण होणाऱ्या ध्यासाने झपाटून त्याच्या मागे लागायचं ठरवतो. बाकी हे बरं असतं सिनेमात… नोकरी, बॉस, घर, बायको ह्यांच्या पैकी काहीच ह्यांच्यामध्ये येत नाही… नाहीतर आम्ही! जाऊ दे, तो एक वेगळा thesis चा विषय होईल! तर ह्या प्रवासात त्याला राधा आगरकर ही मूलतः आणि परिस्थितीने अधिक पुणेरी बनलेली गुरू भेटते! पुढचा प्रवास जुन्या गुरू शिष्य परंपरेला शोभेल असा घडतो… दोघांच्या आयुष्यात उलथापालथ करणारा भूतकाळ, आदित्यची चिकाटी, राधा चं हळूहळू खुलत जाणं आणि शेवटी उगाच करन जोहरी मेलोड्रामा न करता आटोपशीर पण मनाला भिडणारी त्यांची प्रेमकहाणी असा हा सिनेमा आहे
बाकी संवाद लेखनाला वेगळा प्रणाम करावा अशी वाक्य पात्र फेकत असतात तुमच्यावर…
मग तो \’पोपट (एका पात्राच नाव) गाढवा लवकर चल\’ वर
\’पोपट कधी गाढव असतंय का?\’ 😁😁असेल किंवा…
\”तुझा साधा वरण भात पण चांगला होणार नाही, तुझ्या करंज्या फाटतील, तुझे मोदक फुटतील, तुझ्या पुरणपोळ्या कायम करपलेल्या आणि अगोड होतील\” ही खाद्य शिव्यांची लाखोली असेल!!
\”स्वयंपाक करणं म्हणजे काय तर आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं..\” उगाच आपल्याकडे \’हातची चव\’ हा शब्दप्रयोग नाहीये!
\” मी न मनातलं सांगते सगळं माझ्या पदार्थाना.. ते समजून घेतात आणि मग चव येते त्यांना\” हा वरवर जरी मठ्ठ संवाद वाटत असला तरी एवढं जेव्हा आपण गढून जातो तेव्हाच यश मिळतं.. इतनी शिद्दत से मैंने तुम्हे चाहने की कोशिश की है, की हर जररे ने मुझे तुमसे मिलाने की कोशिष की है….
पुलं नी एका ठिकाणी म्हटलं आहे, \”हिच्या हातच्या थॉलिपीठाची चव कशा कशाला येत नाही\” हे इंग्लिश मध्ये भाषांतर करून दाखवा तर मानलं… तर अशी ही मराठी भाषा आणि पदार्थ आहेत.. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याची चव कळत नाही!! पुरण पोळी, सुरलीच्या/ कोथिंबीर/
अळू वड्या, पिठलं भाकरी, फोडणीची पोळी/ भात, आमटीत ली फळं/शंकरपाळे, चकल्या, थालीपीठ, कांदा भजी, वडापाव, साबुदाणा वडा, उकडीचे/ तळणीचे मोदक, तूप मीठ लिंबू लोणचं असा पहिल्या वाफेचा वरण भात….
काही प्रसंगात आदित्य अगदीच मंद वाटतो! आणि पाकात गुलाबजाम टाकल्यावर तळ्यात दगड टाकल्याचा आवाज कसा येतो हे कोडंच आहे! पण तितकं माफ आहे निर्मात्यांना…
सिनेमात म्हटल्याप्रमाणे आणि मलाही आधीपासून सतत खटकत असलेली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा आपल्यालाच अभिमान नाही तर आपण त्याचा प्रचार काय करणार! परवा शिवरात्रीला वाडेश्वरला एका हैदराबाद च्या मित्राला उपास थाळी खाऊ घातली.. त्याला आवडली पण आनंद मला झाला!!! सिनेमा पाहून आल्यानंतर रात्री २ वाजता पूर्णब्रह्म नावाच्या, १५ वर्ष IT मध्ये काम करून आता पूर्णपणे सातासमुद्रापार सुद्धा पूर्ण मराठी जेवणाचे हॉटेल चालवणाऱ्या जयंती काथळे ह्या स्त्री बद्दल वाचून अभिमानाने छाती फुलून आली… अगदी तव्या वरच्या फुलक्यासारखी… !!!
ह्याधी माझ्या काही batchmates ना रुपेरी पडद्यावर पाहिलं आहे, पण एखाद्या सिनेमाला कलाटणी देणारा प्रसंग आपल्या न कळत आपल्याच इमारतीसमोर चित्रित व्हावा आणि थेट तो पडद्यावर पाहिल्यावर कळावं हा धक्का काही वेगळाच आहे!! आमचे शब्दसम्राट मित्र अनिश जोशी Anish ह्याच्याबरोबर comments (त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा मार खायची भीती वाटत होती पण सुदैवाने तसे काही झाले नाही) मारत सिनेमा पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे! तनय जोशी Tanay ह्याच्या मुळे माझी मराठी सिनेमा पहायची वारंवारता अर्थात frequency वाढली!
आणि अर्थात माझ्यातल्या खवय्याची पायाभरणी करणारी माझी आई!! 😇😇
सध्या शोध चालू आहे तो नवीन काहीतरी बनवण्याचा, खाण्याचा आणि सिनेमातल्या त्या जुन्या इमारतीचा!
ता.क. कृपया शुद्धलेखनास हसू नये! मराठी टायपिंग जड जातं! 😁😁